Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.
Showing posts with label येवढा विश्वास नाही राहिला तो माणसावर. Show all posts
Showing posts with label येवढा विश्वास नाही राहिला तो माणसावर. Show all posts

Monday, February 1, 2016

0 येवढा विश्वास नाही राहिला तो माणसावर



येवढा विश्वास नाही राहिला तो माणसावर 
भिंत तोडोनी म्हणे, करु या जगा शमशान सारे I

काय झाले मानवासी मानवाचा घात करतो
तो इराणी, तो इराकी, जीव घेण्या एक सारे I 

धर्म येथे आड ना ये, रंग असो कोणताही
संस्कृतीचे भान नाही, रक्त वाहो रोज सारे I

मानवाचे शौर्य सारे, एकमेकां मारणेसी
या जगाचे एक थडगेची कराया बध्द सारे I 

पाक यांची नीत कैसी, मारती भूके जनांना 
राख करणे, ध्वस्त करणे, पाकड्यांचे खेळ सारे I 

योजना कैसी तुझी आहे मला ते आकळेना 
जोडणे नाही कुठेची, तोडण्याती मग्न सारे I




        - प्रकाश पटवर्धन
        १९४२०१५