३ जानेवारी २००९ रोजी बी बी सी वर एका डायरीचा पहिला भाग प्रसिद्ध झाला आणि जगाचे लक्ष त्या
डायरी कडे वेधले गेले.. प्रत्येकाच्या तोंडी त्या डायरीचाच विषय. काय होत या डायरीत? पाकिस्तानातील
"स्वात" प्रांतातील दहशतवाद्यांचा नंगानाच. या दहशतवाद्यांनी सामान्य जनतेच जगण कठीण करून
टाकलेलं. स्त्रियांवर बंधन टाकण्यात आली. मुलीना शाळेत जाण्यास मनाई केलेली. आता या दहशतवादी
कारवाईचा विरोध कोण करणार. आणि अशात एक शाळेत जाणारी मुलगी, जिने आपल्या वडिलांकडून
रवींद्रनाथ टोगोरांची कविता 'where the mind is without fear' ऐकलेली, एक दिवस आत्मविश्वासाने
सांगते "मला शिकण्याचा अधिकार आहे, खेळण्याचा अधिकार आहे, गाण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे,
मतं मांडण्याचा अधिकार आहे, आणि माझा अधिकार कसा कोण हिरावून घेऊ शकतो.".हे तर अगदी
लोकमान्य टिळक यांच्या सारखेच ना 'स्वातंत्र हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" तिची हिम्मत पाहून
तिच्या मैत्रिणीही शिक्षण घेण्यास तयार होतात. हि बातमी सर्वदूर पसरते आणि एक दिवस शाळेची बस घराकडे परतत असताना अचानक थांबते. बस मधील मुली अवघ्या १३-१४ वर्षाच्या बाहेर डोकावून पाहतात. एक बुरखाधारी दाढीवाला माणूस बसमध्ये घुसतो. आणि जोरात ओरडून विचारतो " कोण आहे ती मुलगी जी अल्लाच्या सैनिकांविरुद्ध, तालीबानिविरुद्ध अपप्रचार करते. तिला याची शिक्षा मिळायलाच हवी. ती मुलगी आत्मविश्वासाने उभी राहते आणि सांगते, "ती मुलगी मीच" आणि तो दहशतवादी गोळी झाडतो.
त्या मुलीच्या डोक्याला गोळी लागते. तिच्या दोन मैत्रिणीही घायाळ होतात. दहशतवादी निघून जातो.. परंतु या मुलीला वेळीच चांगले उपचार मिळतात व ती पुन्हा उभी राहते. तालिबानींच्या हिंसेला आव्हान करते. परंतु आता ती एकटी नसते तिच्या बरोबर जग असत. आता तर तिची ख्याती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराला पोहचते. पुढे या शाळकरी मुलीला पाकिस्तानचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार "सितारा-ए-शुजात" मिळतो, २०१२ मध्ये अमेरिकेच्या 'foreign policy magazine ' मध्ये वैश्विक विचारवंतांच्या यादीत तिच्या नावाचा समावेश होतो. आयर्लंड मध्ये दिल्या जाणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार" तिच्या नावाने घोषित होतो. कोण हि बंडखोर मुलगी ? तिचे नाव आहे मलाला. 'मलाल' या शब्दापासून मलाला हा शब्द आलेला आहे. मलाल म्हणजे दुक्ख किव्वा शोक. मलाला म्हणजे दुक्खी, शोकमग्न.
याच मलाला वर संजय मेश्राम यांनी "सलाम मलाला" हे पुस्तक लिहील आहे. संजय मेश्राम यांनी या पुस्तकात मलालाची प्रेरक कहाणी सांगितलेली आहे. तसेच स्वान्त या प्रांताचा इतिहास व सध्याच्या परिस्थितीच वर्णन केलेलं आहे. संजय मेश्राम यांनी पाकिस्तानातील सध्याच्या परिस्थितीचा हि उल्लेख केलेला आहे. तेथील संवेदनशील व्यक्तींच्या मनात उठणाऱ्या भावनांचा हि वेध लेखकाने केलेला आहे. १४ वर्षाच्या मुलीच्या नजरेतून तालिबानचा थरार ज्या डायरीतून अनुभवायला येतो त्या डायरीचा मराठी अनुवाद करून लेखकाने प्रतुत पुस्तकात दिलेला आहे. मलाला ज्या शाळेत जात होती त्या शाळेच्या दर्शनी भिंतीवर उर्दूत "हे अल्ला! मला खूप खूप ज्ञान दे " बाजूलाच पश्तू भाषेत लिहलेल आहे " शिक्षा म्हणजे प्रकाश"
या पुस्तकाचा प्रवास : कोण आहे मलाला, स्वान्तचा प्रवास- शांतता ते दहशत, मलाला आणि बी. बी. सी. स्वान्तच्या लोकांचे स्थलांतर, पुरस्कार, मलालावरील जीवघेणा हल्ला अस करता करता मलालाच्या डायरी वर संपतो.
पुस्तकाचे नाव : सलाम मलाला
लेखक : संजय मेश्राम.
मनोविकास प्रकाशन
प्रकाशन तारीख : १५ सप्टेबर २०१३.
प्रथम आवृत्ती.
मुल्य : रु.१००
पृष्ठे : १२३.
दत्तात्रय पटवर्धन