Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Thursday, September 4, 2014

2 असे हे इंग्रजी शब्द : भाग 2

window dressing
इंग्रजी चे शिक्षक  'window '  या शब्दाचा अर्थ सांगताना म्हणायचे,

विंडो वातायने खिडकी
गवाक्षे भोक भिंतीचे

असे म्हणून झाले कि लगेच म्हणायचे समजले का गाढवा! आता गाढवा वगैरे म्हटलेले चालत नाही लगेच मानवाधिकार वाल्यांना राग येतो. त्यांना 'गाढवा' च्या मागे लपलेलं प्रेम दिसत नाही आणि कळतही नाही. मग या 'विंडो' शब्दाचा जन्म कसा झाला तर स्कॅन्डिनेवियन माणसे आपली घरे अशी बांधत की एकाच छताखाली राहण्याची व प्राण्यांच्या गोठ्याची सोय करत. परंतु शरद ऋतू मध्ये घरातील धूर व गोठ्यातील दर्प असह्य होत असे म्हणून ते घराच्या भिंतीच्या वरच्या बाजूला लहान झरोके ठेवतं तसेच छताला सुद्धा असेच झरोके ठेवत जेणेकरून घरातील हवा खेळती राहील. त्याला ते म्हणत असतं "vindr auga ' म्हणजेच "the winds eye" ज्यावेळेला इग्रजांनी याची कॉपी केली तेव्हा त्यांनी याला 'window' असे म्हटले. मग या विंडो शब्दाचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग होऊ लागला.

आपण मोठ्या शहरांमध्ये बाजारात फेरफटका मारायला जातो, तेव्हा पाहतो कि काही दुकानांच्या बाहेर खिडकी वजा जागा केलेली असते त्याठिकाणी काही उत्पादने( विक्रीच्या वस्तू) अशा रीतीने सजावट करून मांडलेल्या असतात कि त्याकडे आपण आकर्षित होतो आणि आपण ती विकत घेण्याचा विचार करतो. अशा सजावटीच्या कलेला  'window dressing' असे म्हणतात.

window dressing : the act of decorating and arranging products to display in a store window.
म्हणजेच "अशी कला कि ज्यात उत्पादनं विशिष्ट सजावट करून (  विशेषता फसवी ) मांडली जातात.
याचीच व्याख्या अशीशी केली जाते कि, 'the act or an instance of making something appear deceptively attractive or favourable."

मग या शब्दाचा उपयोग आर्थिक ताळेबंद ( financial statement ) बनवताना केला जातो का? यात आर्थिक ताळेबंदात  कायदेशीर पणे बदल करून अशा रीतीने समोर ठेवला जातो कि जेणेकरून वस्तुस्थिती लपेल व तो दिसायला उत्कृष्ट होईल.

टाइम्स ऑफ़ इंडिया च्या २८.०३.२०१४ च्या अंकात लिहाल होतं कि,
Some mutual funds have come under scanner of the capital markets watchdog SEBI and Industry's front line regulator AMFI for allegedly window dressing their fiscal and assets base through illicit trades.

टाइम्स ऑफ़ इंडिया च ८.२ २००९ चा अंक म्हणतो, As their intention is to dress up their balance sheets to make them attractive like a shopper does to the mannequins, the term "window dressing" used to mean artificial inflation of assets which will wear of after the year end.

अनेकवेळा आपल्यावर थोडा टाइम पास करण्याचा प्रसंग येतो मग आपण निरनिराळ्या क्लुप्त्या शोधतो. कधी होटेल मध्ये बसून चहा घेतो तर कधी रस्त्यावरील लोकांच्या गमती जमती पाहत बसतो. अजून एक अनोखा प्रकार आपण शोधून काढलेला आहे. दुकानांच्या बाहेर असलेले खिडकीवजा जागा जिथे उत्पादने मांडून ठेवलेली असतात त्याचे निरीक्षण करणे. या निरीक्षणाला window  shopping असे म्हणतात. विकत तर काही घ्यायचं नसतं फक्त वेळ जावा म्हणून विक्रीच्या वस्तू पाहत राहणे.

window shopping : the activity of looking at goods displayed in shop windows esp. without intending to buy it.

असं म्हणतात कि,   window shopping is the favourite pastime of all New Yorkers

 दत्तात्रय पटवर्धन
 


असे हे इंग्रजी शब्द : भाग १

2 comments:

  1. Quite informative and interesting. Looking out for many more in coming days and months.

    ReplyDelete
  2. विंडो वातायने खिडकी
    गवाक्षे भोक भिंतीचे

    खूपच भावले !

    ReplyDelete