Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Monday, September 1, 2014

5 असे हे इंग्रजी शब्द : भाग १


असे हे इंग्रजी शब्द : भाग १
Bone of contention

bone of contention
कुत्र्याला हाकलताना आपण हाड हाड करतो. या हाडाचा आणि कुत्रा चघळतो त्या हाडाचा काय संबंध हे मला माहित नाही परंतु एक अनुभव आठवतो. एकदा एक हाड आणि दोन कुत्रे अशी परिस्थिती  होती. हाडाकडे बघून दोघी कुत्री गुरगुरायला लागली. प्रश्न उभा राहिला कि हाड कोणी चघळायचे ? त्यावर भांडण करायचं कि समन्वय करून काही तोडगा काढायचा?  परंतु तोडगा काढण्यास कोणीच तयार नसतं. मग एक विचित्र परिथिती निर्माण होते. दोन्ही पक्ष निर्णयाप्रत येण्यास तयारच नसतात त्यामुळे भांडण, द्वेष, आरोप प्रत्यारोप, मारामाऱ्या , दंगली अशी परिस्थिती उद्भवते. अशी विचित्र परिस्थिती ज्यामुळे तयार होते त्याला इंग्रजीमध्ये "bone of contention' असे म्हणतात. वरील उदाहरणात हाड हे दोन कुत्र्यांमधील भांडणाला कारणीभूत ठरलं त्यामुळे  'हाड' हे 'bone of contention'.
कोलिन्स इंग्लिश डिक्शनरी मध्ये याचा अर्थ "The grounds or the subject of dispute" असा दिलेला आहे.

काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकीस्थान मधील ' bone of contention ' आहे. "theory of evolution" पेक्षा "theory of creation " वर विश्वास ठेवणारी Silvya Baker म्हणते कि, " The theory of evolution has been a 'bone of contention' for past 150 years."

सिविल सर्विसची परीक्षा तीन टप्यात होते; प्रिलिम, मेन आणि इंटरव्हू. प्रिलिम मध्ये २०० मार्कांची जनरल स्टडीज ची तर २००  मार्कांची CSAT ची परीक्षा होते. या CSAT च्या विरोधात विद्यार्थी होते कारण यात इंग्रजी या विषयाला प्राधान्य दिलेले होते. विद्यार्थी या विरोधात रस्त्यावर आले आणि त्यांनी आंदोलन सुरु केलं  त्यावेळी 'The Hindu' या वृत्तपत्राने ७ ऑगस्ट च्या अंकात म्हटले होते कि,
"The protesters' chief bone of contention is the aptitude test or CSAT, which gives more weightage to English, they say."

आर्टिकल ३७० बद्दल असेही म्हणतात, " The draft became bone of contention for all right wing thinkers all around India."

लोकपाल बिल लागू करावं म्हणून अण्णा हजारे यांनी आंदोलन सुरु केलं. परंतु सरकार यासाठी तयार नव्हती म्हणून आंदोलन तीव्र झालं त्यावेळी या आंदोलनाची समीक्षा करताना इंडिया टुडे  च्या २० ऑगस्ट च्या अंकात म्हटलं होतं, "lokpal bill : bone of contention between Government and Anna Hajare"

याच 'bone of contention' साठी दुसरा पर्यायी वाक्प्रचार आहे  'apple of discord' ज्याला आपण 'tender spot' असेही म्हणू. अशी नाजूक जागा कि जराही स्पर्श केला तरी परिस्थिती चिघळते.

आपल्या जवळ अधिक माहिती असल्यास नक्कीच कॉमेंट्स द्वारा शेअर करा अथवा मेल करा abhivyaktiindia2014@gmail.com
दत्तात्रय पटवर्धन

5 comments:

 1. आपण सुरु केलेले सदर नक्कीच माहितीपूर्ण असेल. यातून इंग्रजी शब्द, वाक्प्रचार, म्हणी यांची माहिती वाचकांना नक्कीच होईल. धन्यवाद.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद! धन्यवाद! आपल्या कॉमेंट्स आमच्या साठी असेट्स आहेत.

   Delete
 2. सुरेश पांढरकरAugust 31, 2014 at 7:12 PM

  तेलंगाना ची निर्मिती झाली तेव्हा हैदराबाद चा प्रश्न चिघळला त्यावेळी deccan chronicle' या वृत्तपत्राने ३० ऑक्टोबर २०१३ च्या अंकात 'Telangana : Hyderabad is the bone of contention' असा मथळा दिलेला होता.

  ReplyDelete
 3. एक उत्तम उपक्रम! Let this be 'an apple of readers'eye'.

  ReplyDelete
 4. 'Bone of contention' is equivalent to the phrase 'Apple of contention'. According to Greek mythology, the three most beautiful goddesses, Hera (Goddess of marriage), Athena (Goddess of heroism) and Aphrodite (Goddess of love) contest for a golden apple, thrown by Erida (Goddess of hate) with 'For the most beautiful', inscribed on it.

  ReplyDelete