जगात काही माणसे आभाळा एव्हडं काम करून जातात. सर्वच माणसे इच्छा असून देखील भव्य दिव्य काम करू शकत नाहीत. परंतु काही माणसे रस्त्यातून जाताना रस्त्यातील काटे उचलण्याचे काम करतात जेणे करून त्यांच्या मागून येणाऱ्यांना त्या काट्यांचा त्रास होऊ नये. व अशा लोकांना काही काटे कमी करण्याच श्रेय द्याव लागत. अशा रीतीने प्रत्येक व्यक्ती काहीना काही योग्य कार्य करून या जगाला सुंदर करीत असते.
साहीर लुधियानवी यांचा एक शेर याच गोष्टीचा उहापोह करतो,
माना की इस जमीं को न गुलजार कर सके,
कुछ ख्वार कम तो कर गए, गुजरे जिधर से हम.
साहिरजी म्हणतात, "आम्ही या जगाच नंदनवन तर करू शकलो नाही परंतु ज्या ज्या मार्गावरून आम्ही प्रवास केला त्या मार्गातील काही काटे कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच केला." कुछ ख्वार, येथे हाही अहंकार बाळगलेला नाही कि सर्व काटे दूर केले. आम्हाला शक्य होते तितके केले.
सर्व प्रथम ज्या व्यक्तीने आपल्या घराबाहेर रात्रीच्या वेळेस दिवा लावण्यास सुरवात केली तेव्हा त्या व्यक्तीची सर्वांनी थट्टा केली. त्याच मार्गावरून जाताना ज्या ज्या लोकांना त्या दिव्याच्या उजेडामुळे मार्गक्रमण करण्यास मदत झाली त्यांनीही आपल्या घराबाहेर दिवा लावण्यास सुरुवात केली आणि येथूनच स्ट्रीट लाईट ची कल्पना जगासमोर आली. आज त्या व्यक्तीच्या या छोट्याश्या कृत्यामुळे आम्हाला स्ट्रीट लाईट मिळाले. हे जग सुंदर होण्यास मदत झाली. असेच रात्यावरून काटे वेचत चला एक दिवस नक्कीच या जगाच नंदनवन होईल.जगाच नंदनवन करण्यात आपलाही खारीचा वाटा असावा.
जां निसार खां अख्तर यांचाहि असाच एक शेर आहे.
जिंदगी ये तो नहीं तुमको सवारा ही न हो,
कुछ न कुछ कर्ज तेरा हमने उतारा ही न हो.
मान्य आहे कि निसर्गाने आम्हाला भरभरुन दिलेलं आहे. या जीवनाचे आमच्या वर खूप उपकार आहेत. परंतु हे जीवन सुंदर करण्यास आम्ही काहीच केले नाही असे नाही. हे उपकार, कर्ज फेडण्यासाठी आम्हीही काहीना काही केलेलं आहे. आमचा खारीचा वाटा नक्कीच थोडं कर्ज उतरवण्याच काम करीत आहे.
दत्तात्रय पटवर्धन.
No comments: