Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Friday, May 23, 2014

0 वळून पाहताना ! भाग 1


प्रिय वाचक मित्रांनो,

     भारताचा स्वातंत्रसूर्य अजून नीटसा गगनात उगवलाही नव्हता अन आपल्या सहोदरालाच अपशकून करण्यास निघालेल्या पाकीस्थान नामे सख्ख्या लहान भावाने मात्र ‘व्हीसेरल एनमिटी’ला जागून जणू एखादे अंग कलम करण्याचा प्रयत्न करावा त्याप्रमाणे अवघ्या दोन-चार आठवड्यात भारतावर हल्ला करून काश्मीरचा घास घेण्याचा प्रयत्न केला. पाकिस्थानची निर्मिती करताना गुण्या गोविंदाने नांदण्याची पाकिस्थानच्या निर्मात्याने दिलेली ग्वाही शेवटी कागदोपत्री तशीच पडून राहिली, ती स्वर्णिम पहाट स्वप्नवतच राहिली, हेच खरे!

       सन १९४७ च्या सप्टेंबर-ऑक्टोबर पासून जणू पाचवीला पुजलेला हा पाकिस्तानी युद्धखोर शेजारी अजूनही भ्याडपणे आमच्या पाठीत सुरा खुपसण्याच्या संधीची वाट पहात आहे अन त्याच्या पाठी लपून दुसराही अशाच संधीची आशा करतोय.

-      एक सुप्रसिद्ध कथन आहे कि आपण आपला शेजारी बदलू शकत नाही. सत्कृत दर्शनी हे जरी खरे वाटत असले तरी ते तसे नाही. मनात आले तर आपण शेजार बदलू शकतो. उदाहरणार्थ, आपल्याला  पूर्वेला पाकिस्थानचा शेजार नको होता, आपण पूर्वेला बांगलादेशला  शेजारी केला. चीनला पाकिस्थानचा शेजार हवासा वाटू लागला व त्याने तो अक्साई चीनचा प्रांत काबीज करून मिळवला. आहे कि नाही ट्रीक!

       आमचे सारे अस्तित्वच संग्राममय करणारे, ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचाच  प्रसंग’ चा अनुभव देणारे पाकीस्थान काय किवा चीन काय, सारे लचके तोडायला जमलेल्या लांडग्यांच्या कळपातले!  अशा परिस्थितीत स्वतंत्र भारताच्या युध्दाचा, त्यामागील तत्कालीन व प्राप्त परिस्थितीचा, आपली विदेश नीती, अलिप्ततावाद व अन्य देशाची विदेश नीती तसेच त्यात वेळोवेळी घडलेले तत्कालीक बदल, इ चा आढावा घेणे क्रमप्राप्त वाटते. युद्धस्य कथा रम्य असल्या तरी ‘वळून पाहताना’ ह्या मालिकेत त्यावर भर दिलेला नसेल तर ही मालिका-प्रस्तुती, वरील बाबीचा धांडोळा घेण्यासाठी असेल ज्यामुळे आपल्या समोरील आव्हानाचा अंदाज घेता यावा.

       भारताचे स्वातंत्र, त्यामागील राजकीय व सामाजिक परिस्थिती, सैनिकी पाश्वभूमी, इ चा विचार मी सुरवातीच्या लेखात केला आहे, ज्यायोगे युद्धाच्या वेळच्या परिस्थितीचे नीट आकलन व्हावे. असो.  

       आशा करतो आपल्याला ‘वळून पाहताना’ ही मालिका रुचेल. 

No comments: