Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Monday, September 29, 2014

0 राज ‘राज’ की बात कह गये


राज ‘राज’ की बात कह गये
उधडे ज़ख्मों का दर्द कह गये
रोना अपना रोते रह गये
उद्धव, भाजपा को सुना गये II

गुस्सा आना लाजिम था तब
कदम, कदमताल कर गये
भाजपा से मिलकर हमरे
जख्म सारे हरे कर गये II

कदम के जाने पर भी जैसे
मनसे को राहत मिलनी थी
शिवसेना के पूर्व नगराध्यक्ष की
पाला बदलने की अब बारी थी II

शुभाजी जब छोड शिवसेना
पाला बदल के मनसे आयी
‘राज’ का कुछ तो दर्द सुहाया
घाटा जो उनका भर आया II

उनके आने पर भी यारोँ
याद जो ‘उसकी’ सता रही थी
मद्दिम चुभन ‘उनके’ छुरे की
उभर के तब भाषण में आई II

दुनिया है भैय्या बेगानी
चूनावों की यहीं निशानी
लगी रही है, लगी रहेगी
                      जीवन में यह आनी-जानी II


प्रकाश पटवर्धन



आजचा सुविचार
आजचा सुविचार




Send Feedback

Thursday, September 25, 2014

4 कुरण : रामचंद्र नलावडे.


कुरण : रामचंद्र नलावडे
भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार, समाजाला लागलेली एक कीड. लाकडाच्या  ओंडक्याला आतून पोखरून काढणारी वाळवी तसाच समाजाला आतून पोखरणारा म्हणजे भ्रष्टाचार. आज हा भ्रष्टाचार प्रत्येक क्षेत्रात अगदी खुलेआम दिसून पडतो. हि भ्रष्टाचाराची वाळवी अगदी खालच्या थरापासून ते अगदी वरच्या थरापर्यंत सरेआम चालू आहे. अशातच  समाजातून मग कुठे त्याच्या विरुद्ध पडसाद उमटतात. असाच एक पडसाद  उमटला तो रामचंद्र नलावडे यांच्या 'कुरण' या कादंबरीतून.लेखक स्वत: सरकारच्या महसुल विभागात नोकरी करत होते. त्यामुळे त्यांच्या निरीक्षणातून निर्माण झालेली हि प्रस्तुती.

कोकणातील सारंगपूर नावाच्या तालुक्याच्या गावाचे बाजीराव डोईफोडे हे मामलेदार, नायब तहसीलदार म्हणून काम करणारी देशमुख नावाची तरुणी. तहसिलदाराच्या तालावर नाचणारा तलाठी संघाचा सर्वेसर्वा असलेला लक्ष्मण, प्रांतसाहेब मोडक, लाचलुचपत प्रतिबंधन इन्स्पेक्टर कांबळे आणि माने. यात मग आलेच समजातील तथाकथीत नामवंत माणसे जसे ठेकेदार, खाणीचे मालक इ.  समाजात जसे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध असणारी काही मंडळी असते तसेच तहसिलदाराच्या घरातच त्यांचा मुलगा मंदार, भ्रष्ट आचरणाचा तिटकारा असणारा दाखवला आहे. अशा व्यक्तिरेखा श्री  नलावडे यांनी उभ्या केलेल्या आहेत. या व्यक्तिरेखांच सुंदर रेखाटन हेच या कादंबरीच बलस्थान आहे. एक काळ असा होता कि या लोकांमध्ये काम करण्याची तळमळ होती, लोकांसाठी झिजण्याची तयारी होती, परंतु आज तिचा मागमूसही राहिलेला नाही. या कादंबरीचं वैशिष्ट हे कि पापभिरू आणि ध्येयासक्त माणसेही संगतीने कशी बदलतात आणि नैतिकदृष्ट्या त्यांचे अध:पतन कसे होते याचीही दृश्ये अत्यंत ठळकपणे चित्रित केलेली आहे.  मग कळतं कि एक सडलेला आंबा दहा आब्यांना कसा खराब करतो ते. प्रश्न उत्पन्न होतो कि दहा आंबे एकाला सुधरवू शकत नाही का?

हि समाजाची पोखरण कुठवर चालेल हे सांगता येत नाही. हे अध:पतन असंच चालू राहून समाजाची पूर्ण राखरांगोळी होणार आहे हेही सांगता येत नाही. मला कुठेस वाचलेलं आठवत कि एकदा पंडित नेहरू यांनीलॉर्ड माउंटबेटन यांना पत्र लिहिलं आणि कळवलं कि, " लाइसेंस कोटा पॉलिसी मुळे भ्रष्टाचारला चालना मिळत आहे." यावर

माउंटबेटन यांनी उत्तर दिले कि,
" मि. नेहरू, ज्यावेळेला आपण जिना झाडतो तेव्हा त्याची सुरवात वरून करतो."
किती मार्मिक आणि समर्पक उत्तर.

"कुरण" या कादंबरीतून आपण पोखरत चाललेल्या समाजाचे चित्र तर पाहतोच परंतु वाचताना मनात विचार येतो कि कधी आपण हा जिना साफ करायला सुरवात करणार आहोत. आणि जिना साफ करायचा म्हणजे त्याची सुरवात वरून करायची मग, who will bell the cat?


कुरण 
लेखक : रामचंद्र नलावडे
लोकवाग्मय गृह,
पृष्ठे : 260
किंमत : रुपये ३००.

दत्तात्रय पटवर्धन


आजचा सुविचार
आजचा सुविचार






Sunday, September 21, 2014

0 शायरीचा गुलदस्ता : भाग ९


मी आणि बाप्या सकाळी फिरायला निघालो. मी बाप्याला विचारले, "जीवन म्हणजे काय?" तो म्हणाला, "जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू यामधील सेतू!"
मी म्हणालो, "बाप्या, मग दु:ख पर्वता एव्हढं आणि सुख जवापाडे असं का?"
बाप्या म्हणाला, "अरे, हा पूल झुलता आहे. ह्यावरून चालताना मन जेव्हढ स्थिर तेव्हढा पूल स्थिर! मन डळमळीत तर पूलही डळमळीत! देवा, मन समाधानी असले कि ते स्थिर होते. मनाचे समाधान जीवनाच्या सहजतेत प्रतिबिंबित होते.
यावर मी त्याला म्हणालो, " बाप्या, मन समाधानी असणं कठीणच, म्हणजे पूल हलता व अस्थिर राहणार! मग सरळ नदीत उडी का घेऊ नये."
बाप्या म्हाणाला, "म्हणजे आत्महत्या! अरे, तुला गालिबचा गझल हा शब्द उच्चारताच एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे मिर्झा असदुल्ला खां गालिब. उंच, धिप्पाड बंध, लालसर गौरवर्ण, भव्य कपाळ अनं किंचित वर आलेली गालाची हाडे. संगीताचा शौकीन, मदिरा-मदिराक्षी नृत्यादी विलासी जीवनाची आसक्ती बाळगणारा गालिब सरदार जाफारींच्या मते स्वभावाने इराणी, धर्माने अरबी, पण शिक्षणाने आणि संस्कृतीने पूर्णतया भारतीय असे काहीसे गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व होते. अत्यंत दुखत दिवस घालावेला गालिब म्हणतो, यारब! जमाना मुझको मिटता हैं किस लिये, लोहे-जहापे हर्फे-मुकर्रर नाही हू मै | जन्म : २७ डिसेम्बर १७९७ मृत्यू : १५ फेब्रुवारी १८६९ शेर आठवतो का?

घबराके के ये कहते है की मर जायेंगे
मरके भी चैन न पाया तो किधर जाएंगे ||

दु:खाला घाबरून मृत्युला कवटाळलं तर एकदाची शांती, मुक्ती प्राप्त होईल असं सर्वांनाच वाटतं. पण मृत्यू तर वस्त्र बदलण्याची क्रिया, दु:खापासून मुक्ती नाही मिळाली तर.. गालिब
Caption
विचारतोय कि आत्महत्येनंतरही तुला चैन आणि मुक्ती मिळाली नाही तर? घाबरून जीवनापासून दूर-दूर जाणा-यांना कळत कसं नाही कि जीवन जगण्यासाठी आहे. सारी सुख अनुभवतांना कधी असा विचार करतो कां? मग दु:खाबद्दल वेगळा विचार कां? सुख-दु:खाकडे समभावाने पाहणे जमले तर सुख- जीवन-रुपी पूल नेहमीकरता स्थिर राहील.

मी म्हणालो, "बाप्या गालिबचा सडेतोड प्रश्न अगदी बरोबर आहे. आपली मुक्ती सुख-दु:खाला समभावाने स्वीकारण्यात आहे."

बाप्याने मिर्झा गालिबचा दुसरा शेर पेश केला अन प्रश्नही टाकला ‘दु:खाची इतिश्री मरणातच आहे, हे खरे आहे का?’

कैदे हयात-ओ-बन्दे-गम असलमे दोनों एक है,
मौत से पहले आदमी गमसे नजात
कैदे हयात-ओ-बन्दे-गम असलमे दोनों एक है
पाए क्यों?

जीवन आणि दु:ख या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. दु:खाच गाठोडं जीवनाच्या वाटेवर घेऊनच चालायचं असतं नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत.

तुकोबांच्या तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे. भाषेत सांगायचे तर

आपुले मरण पाहिले म्या डोळा | तो जाहला सोहळा अनुपम्य|
आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने | सर्वात्मकपणे भोग जाहला |

दत्तात्रय पटवर्धन

विजया यादव






आजचा सुविचार
आजचा सुविचार


Send Feedback

Thursday, September 18, 2014

0 असे हे इंग्रजी शब्द : भाग 5


मागील लेखातील रुल ऑफ थंब 'rule of thumb' पिण्याच्या बाबतीतही होता असे मी सांगितले तर थोडे आश्चर्य वाटेल. पिण्याच्या बाबतीतला रूल ऑफ थंब म्हणजे पहिला पेला रिचवला कि मग दुसरा प्याला घ्यायचाच नाही किंवा भरलेला पेला समोर असेल तर फक्त तीन बोटांच्या रुंदी इतकी ग्लासातील दारू प्यायची ज्यामुळे चटक लागणार नाही आणि तळीरामही होणार नाही. आयुष्य मग 'एकच प्याला' म्हणत म्हणत सरणार नाही. समाजातील अनेक तळीराम व त्यांची झालेली दुर्गती पाहून ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ह्या म्हणीप्रमाणे काही शहाण्यांनी आपल्या चळवळीतून इंग्रजी भाषेला एक शब्दाचे दान दिले. तो शब्द म्हणजे ‘Teetotaler’. आज आपण ह्या शब्दाच्या निर्मितीशी निगडीत कथेचा विचार करणार आहोत.

     एकोणिसाव्या शतकात 'अमेरिकन टेम्पेरन्स यूनियन' ने प्रेस्तोन, इंग्लंड येथे प्रथम हि  चळवळ सुरु केली. या चळवळीत दारू वा तत्सम मादक द्रव्यापासून दूर राहणाऱ्यांची संघटना उभी केली व त्या विरोधी प्रचार सुरु केला. या चळवळीत सामील झालेल्यांना एक प्रतिज्ञा पत्र लिहून द्यावे लागत असे. अश्या चळवळीतील कार्यकर्त्यांना कुठेही सही करताना सहीच्या आधी "T"  लिहिण्याची प्रथा होती. या  "T" चा अर्थ होता "Total Abstinance". पुढे T + total म्हणजे ज्यांनी शपथ पत्रावर सह्या केल्या आहेत ते T-totaller किंवा  teetotallers असे झाले. तेव्हा पासून हा शब्द दारू न पिणा-यांसाठी वापरात येऊ लागला.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शाकाहारी व  दारूला न शिवणारे व्यक्ती आहेत हे इंग्रजीत कसे व्यक्त केले आहे -  Prime Minister Narendra Modi is a vegitarian teetotaller.

     पिण्याच्या बाबतीतील रूल ऑफ थब म्हणजेच ‘’Social drinking” चा अर्थ पिणे दुय्यम असावे, त्याची सवय लागू नये,  पिणा-याचा तळीराम होऊ नये, हा सुविचार होता. याच अर्थाचा एक दुसरा वाक्प्रचार म्हणजे - To be able to hold one's liquor. म्हणजेच मर्यादेत राहून दारू पिणे.

कालांतराने समाजात आधुनिक विचारसरणी वाढीस लागली व दारू वा तत्सम मादक पेयपानासाठी वेगवेगळी करणे शोधली जाऊ लागली. ‘चेंज/बदल म्हणून’, ‘समारंभ म्हणून’, ‘आनंद साजरा करण्यासाठी’, ‘सामाजिक सद्भावना’, इ.  काही माणसे प्रसंग पाहून पिण्याचा आनंद घेतात. एखाद्या समारंभाच्या वेळी, सणाच्या दिवशी किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या  प्रसंगाने ते दारूचे सेवन करतात. यालाच आपण "social drinking" असे म्हणतो.

काही महाभाग तर पिण्याच्या बाबतीत हद्द पार करतात. वेळ मिळेल त्यावेळेस ओठाला ग्लास लावतात. त्यांना फक्त बहाणा हवा असतो. अशा पिण्यास " alcoholic" असे म्हटले जाते.
  गम्मत म्हणजे ह्या देशात दारूबंदीचा आग्रह महात्मा गांधीनी जरी धरला तरी त्या तत्वापेक्षाही महत्वाचे ठरले ते पिणारे अन मद्याच्या विक्रीपासून अबकारी कर मिळविणारे सरकार! गावागावातून स्त्रियांनी दारूची दुकाने बंद करण्यासाठी केलेली आंदोलने काय, अर्ज-विनंत्या काय, त्यासाठी केलेले मतदान काय, सारे क्षणिक ठरले; दारू पासून परावृत्त करू शकले नाही. What cannot be cured........ दुसरे काय!




दत्तात्रय पटवर्धन    


Send Feedback

Sunday, September 14, 2014

0 असे हे इंग्रजी शब्द : भाग ४




आपल्याला अनेकवेळा त्या त्या प्रांताच्या जीवनशैलीची जाणीव त्या प्रांतीय भाषेतून होते. चीनमध्ये कुत्र्यांना गावाच्या आत येऊ देत नसत. मग लोकांनी वेशीबाहेर फेकलेल्या कचऱ्यातून त्यांना जे खायला मिळत असे त्यावरच ते जगत. कुत्र्याचं जगणं अत्यंत दयनीय होतं. गावात कोणी गुन्हेगार असेल तर त्यालाही असंच वेशीबाहेर काढलं जायचं. ज्याला आपण आज तडीपार केलं असं म्हणतो. या तडीपार केलेल्यांची परिस्थिती अशीच दयनीय व्हायची. मग अशा या तडीपार केलेल्या गुन्हेगारांना 'going to dogs' असे म्हणत. आपण म्हणत नाही का, तो कुत्र्याच जिणं जगतोय. आता याच वाक्प्रचाराचा उपयोग अनेक ठिकाणी करू लागलोय. १९३४ च्या सुमारास ह्याचा अर्थ ‘get dressed up’ असा होत असे. १८९० च्या सुमारास शर्टाच्या कडक उभी कॉलर ‘dog collar’ म्हणून सा-या पुरुष-फैशन जगतात प्रसिद्ध झाली होती. जेव्हा एखादी संस्था डबघाईला पोहचते तेव्हा आपण म्हणतो, the institution is going to dogs. जेव्हा एखाद्या शाळेची शिस्त दिवसे दिवस खालावत जाते तेव्हा आपण म्हणतो, the discipline of the school is going to dogs. जेव्हा रेल्वेची सेवा दिवसागणिक ढासळते तेव्हा आपण म्हणतो, the railway service is going to dogs.

If you keep acting like that, your reputation is going to dogs.

म्हणजेच जर तू असंच वागत राहिलास तर एक दिवस तुझी प्रतिष्ठा धुळीला मिळेल.

परंतु आज सुदैवाने कुत्र्यांची स्थिती चांगली सुधारलेली आहे. कुत्रा कडेवर तर मुल पायी पायी असे चित्र अनेकवेळा दिसते. कुत्रासाठी वेगळे अन्न मोठमोठ्या मॉल्समध्ये मिळते. माणूस आजारी पडल्यास एकवेळ डॉक्टर येणार नाही पण कुत्रा आजारी असल्यास डॉक्टरची सेवा एका कौलवर उपलब्ध होते. मराठीतील संतवचन ‘श्रीमंता घराचे श्वान’ हा एकाच चांगल्या र्थी ‘कुत्रा’ ह्या शब्दाचा उपयोग आहे. अन्यथा कुत्रा ह्या शब्दाने ‘हीनत्व’ दाखवलेले दिसते. ‘every dog has its day' या वाक्प्रचाराला ४००-५०० वर्षापूर्वी शेक्सपिअर ने त्याच्या 'हॅमलेट' (Hamlet Hamlet (The Tragedy of Hamlet, Prince of Denmark, often shortened to Hamlet, is a tragedy written by William Shakespeare at an uncertain date between 1599 and 1602. Set in the Kingdom of Denmark, the play dramatises the revenge Prince Hamlet is instructed to enact on his uncle Claudius. Claudius had murdered his own brother, Hamlet's father King Hamlet, and subsequently seized the throne, marrying his deceased brother's widow, Hamlet's mother Gertrude. ) मधून प्रसिद्धी दिली. every dog has its day म्हणजेच everyone gets a chance eventually. चार दिवस सासूचे एक दिवस सुनेचा. McGraw-Hill Dictionary of American Idioms and Phrasal Verbs मध्ये याचा उपयोग केला आहे तो असा, Don't worry, you shall get chosen for the team. Every dog has its day. You may become famous some day, every dog has its day.

मध्ययुगीन काळातील डच विद्वान इरामस (Eramus
Caption
) नुसार, ग्रीक नाटककार युरीपिदास ( EuripidasEuripides (/jʊəˈrɪpɨdiːz/ or /jɔːˈrɪpɨdiːz/; Greek: Εὐριπίδης) (c. 480 – 406 BCE) was one of the three great tragedians of classical Athens, the other two being Aeschylus and Sophocles. Some ancient scholars attributed ninety-five plays to him but according to the Suda it was ninety-two at most. Of these, eighteen or nineteen have survived more or less complete (there has been debate about his authorship of Rhesus, largely on stylistic grounds) and there are also fragments, some substantial, of most of the other plays. More of his plays have survived intact than those of Aeschylus and Sophocles together, partly due to mere chance and partly because his popularity grew as theirs declined—he became, in the Hellenistic Age, a cornerstone of ancient literary education, along with Homer, Demosthenes and Menander. Euripides is identified with theatrical innovations that have profoundly influenced drama down to modern times, especially in the representation of traditional, mythical heroes as ordinary people in extraordinary circumstances. This new approach led him to pioneer developments that later writers adapted to comedy, some of which are characteristic of romance. Yet he also became "the most tragic of poets", focusing on the inner lives and motives of his characters in a way previously unknown. He was "the creator of...that cage which is the theatre of Shakespeare's Othello, Racine's Phèdre, of Ibsen and Strindberg," in which "...imprisoned men and women destroy each other by the intensity of their loves and hates", and yet he was also the literary ancestor of comic dramatists as diverse as Menander and George Bernard Shaw.[9] ) चा खून त्याच्या विरोधकांनी त्याच्यावर कुत्री सोडून केला होता. तेव्हा पासून हा वाक्प्रचार प्रचलित झाला. अगदी खालच्या थरातील व्यक्तीही आपले शोषण करणाऱ्याचा बदला घेऊ शकतो अस त्याचा मतितार्थ होता.

दत्तात्रय पटवर्धन


असे हे इंग्रजी शब्द : भाग १

असे हे इंग्रजी शब्द : भाग 2

असे हे इंग्रजी शब्द : भाग 3



Thought for a Day


Caption


Send Feedback


Wednesday, September 10, 2014

0 उत्सव मनवा आयुष्याचा !

टिळक महाराज कळतंय मला
भांडुन काही उपयोग नाही
वेडे, मुर्ख, वा गाढव म्हणुन
गीता कोणा कळणार नाही II
मारुन-मुटकून कळले तरी
एकदम कधी वळणार नाही
मूर्ती-निर्माल्य विसर्जनाची
सहज संवय तुटणार नाही II
निराश नका होऊ देवा
विचार येथे सारे करती
पुढे कोणी येईल म्हणुनी
सगळेच मागे-मागे राहती II
जल-प्रदुषण दूर कराया
गोदाकाठी नासिक ग्रामी
भक्त दान स्वानंदे करीती
टनभार निर्माल्य अन लाखों मूर्ती II
उत्सव बाप्पाचा हो करीता
वाजत-गाजत दहा दिसाचा
तसाच देवा करा साजरा
उत्सव अपुल्या आयुष्याचा II
          - प्रकाश पटवर्धन.

Tuesday, September 9, 2014

0 असे हे इंग्रजी शब्द : भाग 3

न्यायाधीश फ्रान्सीस बुल्लर स्टिक्स विकताना दाखवला आहे. 
प्रत्येक वयात शब्दांचा किंवा एखाद्या गोष्टीचा अर्थ आणि संदर्भ बदलत असतो. बालपणी 'दिल' म्हणजे फक्त एक धडधडणारे दृदय, तरुणपणात हा संदर्भ बदलतो आणि म्हातारपणी 'दिल' धडधडू  लागले कि सारे अस्वस्थ होतात.साप्रकार लहानपणी कोणाला ठेंगा दाखविण्यासाठी अंगठ्याचा केला जातो, तर मोठेपणी त्याचा thumps up ! होतो. आता हा अंगठा दिसला कि फेसबुक वरून फेरफटका मारतोय कि काय असाच भास होतो.

इंग्रजी भाषा-विश्वात आपली भेट "Rule  of thumb" शी होते.  ऐकताना गंमत वाटेल कि पूर्वीच्या काळी बायकोला मारण्यासाठी इंग्लंडमध्ये अंगठ्याइतक्या जाडीची काठी वापराची मुभा होती. असे म्हणतात कि सतराव्या शतकात इंग्लिश न्यायाधीश सर फ्रान्सिस बुल्लर  यांनी असा नियम बनवला होता कि पतीने पत्नीला काठीने मारण्यात  काही गैर नाही, जर ती काठी अंगठ्याच्या जाडीची असेल. मग सगळीकडे याच्या विरोधात आक्रोश निर्माण झाला. अनेक मासिकातून, वृत्तपत्रातून कार्टून्स येऊ लागली. परंतु  अशा प्रकारच्या नियमाला कोठेही पुरावा नाही आणि जरी असा नियम नसला तरी त्या काळी स्त्री ला अशी वागणूक दिली जात होती यात काही वाद नाही. काही जण यालाच rule of thumb ची जन्म कहाणी मानतात. परंतु याचा संबंध नाही असे अनेकांचे म्हणणे आहे.
  
आता अगठ्याचा उपयोग मापनासाठी कसा होत गेला हे पाहणे उद्बोधक ठरेल. बरं अंगठा इंग्लंड मध्येच वापरला जात असे असेही नाही तर सर्व इंडो-युरोपिअन देशात त्याचे चलन होते. डच लोक duim, फ्रेंच pouce, इटालियन pollice, स्पानिश pulgada, तर संकृतात अन्गुलम म्हणत.

एक कथा अशीही आहे कि पूर्वीच्या काळी शेतकरी पेरणी विशिष्ट अंतरावर करण्यासाठी वा विशिष्ट खोली मापण्यासाठी अंगठ्याचा उपयोग करीत असतं. बिअरच्या किण्वन क्रियेसाठी लागणारे योग्य तापमान त्या द्रवात अंगठा घालून तपासात असतं. सुतार आपल्या कामात मोजमाप करण्यासाठी अंगठ्याचा उपयोग करायचा. आजही चित्र काढताना आपण एखादी वस्तू आपल्या नजरेसमोर अंगठा/बोट ठेऊन त्या वस्तूचे मापन चित्र काढण्यासाठी करतो. मी कुठेसं असही ऐकलं आहे कि जर चार बोटं वळवून अंगठा उभा ठेवला अगदी थम्स अप प्रमाणे व त्या अगठ्यात जितका बाक असेल तितका तो माणूस गर्विष्ठ असतो. अशा अनेक उदाहरणावरून रुळे of thumb या वाक्प्रचाराचा जन्म झाला असावा असे मत आहे. अर्थात हे सारे कयास आहेत.

Rule of thumb means a method of procedure based on experience and common sense, a general principle regarded as roughly correct but not intended to be scientifically accurate. 

याचाच अर्थ असा कि अनुभवावरून बनवलेला एखादा सरळसोट नियम. तो प्रत्येक ठिकाणी लागू होईलच असे नाही कारण या नियमाला काही शास्त्रीय आधार नसतो. उदा. अंगठ्याच्या लांबी एव्हडं म्हणजे एक इंच असा सरळसोट नियम. 

Rule of Thumb’ च्या जन्माची हि चित्तर-कथा तुम्हाला आवडली असेलच.

दत्तात्रय पटवर्धन 

Saturday, September 6, 2014

0 प्रदूषण

pollution photo: Stop Pollution Idiot StopollutionIcon.gif
प्रदूषण –

      प्रदूषण म्हणजे काय? एक छोटासा प्रश्न पण उत्तर मात्र कर्मकठीण! अगदी प्रश्नाच्या एकूण अक्षराइतके कागद खरडले तरी मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढणारे. असो. आपण सामान्य माणसाशी निगडीत प्रदूषणाचा विचार प्रामुख्याने करू म्हणजे त्याची व्याप्ती नियंत्रित होईल.

      साध्या शब्दात सांगायचे झाल्यास प्रदूषण म्हणजे निसर्ग वा वातावरणाची हानी होईल अशी कोणतीही मानवी व नैसर्गिक क्रिया किंवा निसर्गाने मानवी अस्तित्वासाठी पूरक अश्या ज्या ज्या गोष्टी दिल्या आहेत, त्याच्या रचनात्मक, लाभप्रद व स्वस्थ उपयोग करण्याच्या मानवी अधिकारावर गदा आणणाऱ्या बाबी म्हणजे प्रदूषण. मानवी अस्तित्वाच्या तीन मुलभूत नैसर्गिक गरजांचा – जमीन, पाणी आणि वायू - विचार करू या.

१.     जमीन – भौतिक जगात जमिनीचे महत्व अनन्य साधारण आहे. महाभारतातील कौरव-पांडव युद्ध हे कौरवांनी ‘सुईच्या अग्रावर राहील इतकीही जमीन’ पांडवांना देण्यास नकार दिल्यामुळे झाले होते, ह्यावरून लक्षात यावे.

जमिनीचे प्रदूषण हे फार जुने आहे व वर्षानुवर्षे जमिनीच्या गैरवापरामुळे ते उद्भवले आहे. साहजिकच त्याची व्याप्ती आणि गंभीरता तेव्हडीच भयानक आहे. रचनात्मक, व लाभप्रद कामासाठी योग्य असलेला जमिनीचा पट्टा बरीच वर्षे तसाच पडीक राहिल्यासही तो ओसाड होतो/ठरतो अन तो तसाच राहतो. म्हणून अशा जमिनींवर दर पावसाळ्यात सामाजिक वनीकरण सुनिश्चित करणे गरजेचे आहे.

शहरीकरण, महामार्गाच्या, धरणाच्या योजनामुळे तसेच कारखान्यासाठी लागणारी जमीन मिळविण्यासाठी होणारी वृक्षतोड वा ओसडीकरण अशा प्रदूषणास जबाबदार आहे. शहरीकरण व कारखानदारीमुळे मोठ्या प्रमाणावर सांडपाणी नदी, नाल्यात, तलावात वा समुद्रात सोडले जाते. जमिनीत झिरपलेले असे पाणी आपल्याबरोबर द्राव्य स्वरुपातील द्रवित प्रदूषके प्रथम जमिनीत व नंतर तेथून पाण्याद्वारे पिकात शोषली जाऊन, आपले अन्नही प्रदूषित करतात, हे विशेष. झाडा-झुडपांची मुळे मातीला धरून ठेवतात. वृक्षतोडीमुळे हिरवळ वा वनक्षेत्र कमी झाल्यामुळे जमिनीची धूप होते, डोंगरावरील मातीचे बॉन्डेज कमी वा नष्ट झाल्यामुळे कडे कोसळण्याचे प्रकार वाढतात. पावसाचे पाण्याबरोबर सैल झालेली माती पाणी मुरताच ढासळते व आपली जागा सोडून उतारावरून खाली येते. हिमाचल मधील ढगफुटी व दरडी कोसळण्याच्या घटना मानवाने स्वार्थापोटी केलेल्या निसर्गाच्या लयलुटीची कहाणीच सांगतात. जसजसे डोंगर-कडे बोडके होत जातील तसतश्या ढगफुटी, दरडी कोसळणे, पूर येणे इ. घटना वाढत जातील व त्याची तीव्रताही वाढत जाईल. ती नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय-योजना करणे जरुरीचे आहे.

शेती हा सर्वात प्राचीन व्यवसाय. वाढत्या जनसंख्येच्या प्रमाणात अन्न-धान्याचे उत्पादन हा एक प्रकारे मानवाच्या समोरील गहन प्रश्न आहे. मधल्या काळात अधिक उत्पादनाच्या रेट्याखाली मानवाने पुरातन शेतीची संकल्पना सोडून आधुनिक पद्दतीने शेती करण्यास सुरवात केली. कोणतीही पद्धती विचारात घ्या, त्याचे काही फायदे तर काही तोटे असतात. आधुनिक शेती त्याला अपवाद कशी बरे असेल? उत्पादन वाढीच्या बाबतीत हि पद्दत खूपच परिणामकारक सिद्ध झाली असली तरी तिचे तोटेही तेव्हडेच गंभीर होते. रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा उपयोग कालांतराने वाढत गेला व अतिवापरामुळे जमिनीचा कस कमीकमी होऊ लागला, त्यात वर्षाकाठी ३-३ पिके घेतल्यामुळे रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा उर्वरित भाग/गाळ जमिनीत रहात गेला व जमिनी प्रदूषित होऊ लागल्या. हीच प्रदूषके पाण्याबरोबर पिकात शोषली जाऊन आपले अन्नही प्रदूषित करु लागले.

मानवाला दिवसभराच्या श्रमानंतर विश्रांतीची गरज भासते मात्र अशी गरज त्या जमिनीला का मिळू नये, हा विचारही त्याच्या मनात येत नाही कारण आजचा मानव निसर्गाला सहचर न मानता आपल्यासाठी निर्मिलेल्या अनेक वस्तूपैकी एक समजून कोणत्याही गोष्टीचा विधिनिषेध न ठेवता अक्षरशः ओरबाडतोय. पूर्वीच्या शेतीत पिकांची अदलाबदल केली जायची, शेत-जमिनीच्या तुकड्यांना एक एक करून आळीपाळीने विश्रांती दिली जायची किवा त्यावर लावलेले गवत वाळल्यावर मातीत खत म्हणून मिसळले जायचे. अशा त-हेने त्याची पत व कस टिकविण्याचा प्रयत्न केला जायचा. सर्वार्थाने निसर्गाची सोयरिक केली जात होती, माणसासारखा व्यवहार केला जात असे. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोळा हा सण. वर्षभर शेतात राबणाऱ्या ह्या जनावराच्या दो-या, वेसण, इ. सारे जुने टाकून नवे वापरले जायचे, असे सजवलेले बैल गावभर मिरवणुकीने नेले जात. पुरणाची पोळी त्याला खाऊ घातली जात असे. नारली पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून श्रीफळ अर्पण केले जाणे हाही त्याचाच एक भाग. निसर्गाबद्दलची हि कृतज्ञतेची भावना होती. निसर्ग नियमांना प्रमाण मानून मानवाने आपली प्रगती केली, त्यांना तुडवून नाही.

प्रदूषणामुळे पृथ्वीचे तापमान 0.06o C ने वाढले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे ग्लेसिअर, हिमशिखरे, इ. वरील बर्फ वितळण्यास सुरवात झाली आहे. ह्याचा परिणाम नद्यांना पूर येणे, जीव आणि वित्त हानी होणे, जमिनीचा कसदार असा वरचा शेतीला उपयुक्त थर वाहून जाणे, समुद्राची पातळी उंचावणे, समुद्राचे भूभागावर अतिक्रमण, असे गहन प्रश्न निर्माण होत आहेत. मुंबई सारखी शहरे जलमय होण्याचा धोका नाकारता येत नाही.  गेल्या वर्षापासून नेपाळ मधून भारतात येणा-या नद्यांचे जल-स्तर वाढल्याने, बिहार मधील कोसीसारख्या नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर येत आहेत व त्याच्या विध्वंसाच्या बातम्या आपण पेपर मध्ये बघत आहोत. उत्तराखंड नंतर आता काश्मीर घाटीमध्ये गेल्या पन्नास वर्षातील जबरदस्त पूर आहे, जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमालयातील वितळणा-या बर्फाचा तर हा प्रताप नाही ना?

आपल्या वसाहती, शहरातून निघणारा कचरा व सांडपाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रदूषणास जबाबदार आहे. अल्युमिनम, प्लास्टिक, लाकूड, कागद, गाड्यात वापरली जाणारी तेले, इंजिन ओईल, केरोसीन, इ. प्रदूषणास हातभार लावतात. गृहनिर्माण प्रकल्पही जमीन, पाणी तसेच वायू प्रदुषणास कारणीभूत ठरतात.

अणुभट्ट्यातील किरणोत्सारी पदार्थ दूरगामी परिणाम करतात. विविध कॅन्सरची शक्यता वाढते. जपान मधील अणुभट्टीच्या अपघाताचे परिणाम आजही जाणवतात.

भारतीय संस्कृती सकाळी उठल्यावर, जमिनीवर पाय ठेवण्याच्या आधी जन्मभूची ‘समुद्र वसने देवी......पाद्स्पर्षे क्षमस्वमे’ श्लोकाच्या पठणाद्वारे क्षमा मागायला शिकवते. निसर्गाच्या सान्निध्यात मानवी जीवन फुलते तर निसर्गाविना ते कोमेजते हे आमचे पूर्वज जाणत होते. मानवाने केलेल्या प्रदूषणाला कमी करायचे असेल तर आपण खालील कामे करु शकता -

·       पर्यावरणाबद्दल जागरुकता समाजात निर्माण करायला हवी;
·       तीन R चा अवलंब रोजच्या जीवनात करावयास हवा :
-    Reuse – पुन: उपयोग करणे;
-    Recycle- पुन: उत्पादित करणे;
-    Reduce – उपयोग कमी करणे.
·       पेकेज्ड वस्तूंचा उपयोग टाळणे व शक्य नसल्यास कमी करणे. ह्यामुळे प्लास्टिक आवरणाचा कचरा कमी होऊ शकतो;
·       शेती नैसर्गिक पद्धतीने रासायनिक खाते व कीटकनाशके न वापरता करणे;
·       आजूबाजूला उघड्यावर घाण न करणे तसेच कचर्याची योग्य विल्हेवाट लावणे;
·       डम्पिंगची जागा गावापासून दूर असावी.

प्रकाश पटवर्धन 

निसर्ग ! निसर्ग! निसर्ग!

निसर्ग ! निसर्ग! निसर्ग!

Thursday, September 4, 2014

2 असे हे इंग्रजी शब्द : भाग 2

window dressing
इंग्रजी चे शिक्षक  'window '  या शब्दाचा अर्थ सांगताना म्हणायचे,

विंडो वातायने खिडकी
गवाक्षे भोक भिंतीचे

असे म्हणून झाले कि लगेच म्हणायचे समजले का गाढवा! आता गाढवा वगैरे म्हटलेले चालत नाही लगेच मानवाधिकार वाल्यांना राग येतो. त्यांना 'गाढवा' च्या मागे लपलेलं प्रेम दिसत नाही आणि कळतही नाही. मग या 'विंडो' शब्दाचा जन्म कसा झाला तर स्कॅन्डिनेवियन माणसे आपली घरे अशी बांधत की एकाच छताखाली राहण्याची व प्राण्यांच्या गोठ्याची सोय करत. परंतु शरद ऋतू मध्ये घरातील धूर व गोठ्यातील दर्प असह्य होत असे म्हणून ते घराच्या भिंतीच्या वरच्या बाजूला लहान झरोके ठेवतं तसेच छताला सुद्धा असेच झरोके ठेवत जेणेकरून घरातील हवा खेळती राहील. त्याला ते म्हणत असतं "vindr auga ' म्हणजेच "the winds eye" ज्यावेळेला इग्रजांनी याची कॉपी केली तेव्हा त्यांनी याला 'window' असे म्हटले. मग या विंडो शब्दाचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग होऊ लागला.

आपण मोठ्या शहरांमध्ये बाजारात फेरफटका मारायला जातो, तेव्हा पाहतो कि काही दुकानांच्या बाहेर खिडकी वजा जागा केलेली असते त्याठिकाणी काही उत्पादने( विक्रीच्या वस्तू) अशा रीतीने सजावट करून मांडलेल्या असतात कि त्याकडे आपण आकर्षित होतो आणि आपण ती विकत घेण्याचा विचार करतो. अशा सजावटीच्या कलेला  'window dressing' असे म्हणतात.

window dressing : the act of decorating and arranging products to display in a store window.
म्हणजेच "अशी कला कि ज्यात उत्पादनं विशिष्ट सजावट करून (  विशेषता फसवी ) मांडली जातात.
याचीच व्याख्या अशीशी केली जाते कि, 'the act or an instance of making something appear deceptively attractive or favourable."

मग या शब्दाचा उपयोग आर्थिक ताळेबंद ( financial statement ) बनवताना केला जातो का? यात आर्थिक ताळेबंदात  कायदेशीर पणे बदल करून अशा रीतीने समोर ठेवला जातो कि जेणेकरून वस्तुस्थिती लपेल व तो दिसायला उत्कृष्ट होईल.

टाइम्स ऑफ़ इंडिया च्या २८.०३.२०१४ च्या अंकात लिहाल होतं कि,
Some mutual funds have come under scanner of the capital markets watchdog SEBI and Industry's front line regulator AMFI for allegedly window dressing their fiscal and assets base through illicit trades.

टाइम्स ऑफ़ इंडिया च ८.२ २००९ चा अंक म्हणतो, As their intention is to dress up their balance sheets to make them attractive like a shopper does to the mannequins, the term "window dressing" used to mean artificial inflation of assets which will wear of after the year end.

अनेकवेळा आपल्यावर थोडा टाइम पास करण्याचा प्रसंग येतो मग आपण निरनिराळ्या क्लुप्त्या शोधतो. कधी होटेल मध्ये बसून चहा घेतो तर कधी रस्त्यावरील लोकांच्या गमती जमती पाहत बसतो. अजून एक अनोखा प्रकार आपण शोधून काढलेला आहे. दुकानांच्या बाहेर असलेले खिडकीवजा जागा जिथे उत्पादने मांडून ठेवलेली असतात त्याचे निरीक्षण करणे. या निरीक्षणाला window  shopping असे म्हणतात. विकत तर काही घ्यायचं नसतं फक्त वेळ जावा म्हणून विक्रीच्या वस्तू पाहत राहणे.

window shopping : the activity of looking at goods displayed in shop windows esp. without intending to buy it.

असं म्हणतात कि,   window shopping is the favourite pastime of all New Yorkers

 दत्तात्रय पटवर्धन
 


असे हे इंग्रजी शब्द : भाग १

Monday, September 1, 2014

5 असे हे इंग्रजी शब्द : भाग १


असे हे इंग्रजी शब्द : भाग १
Bone of contention

bone of contention
कुत्र्याला हाकलताना आपण हाड हाड करतो. या हाडाचा आणि कुत्रा चघळतो त्या हाडाचा काय संबंध हे मला माहित नाही परंतु एक अनुभव आठवतो. एकदा एक हाड आणि दोन कुत्रे अशी परिस्थिती  होती. हाडाकडे बघून दोघी कुत्री गुरगुरायला लागली. प्रश्न उभा राहिला कि हाड कोणी चघळायचे ? त्यावर भांडण करायचं कि समन्वय करून काही तोडगा काढायचा?  परंतु तोडगा काढण्यास कोणीच तयार नसतं. मग एक विचित्र परिथिती निर्माण होते. दोन्ही पक्ष निर्णयाप्रत येण्यास तयारच नसतात त्यामुळे भांडण, द्वेष, आरोप प्रत्यारोप, मारामाऱ्या , दंगली अशी परिस्थिती उद्भवते. अशी विचित्र परिस्थिती ज्यामुळे तयार होते त्याला इंग्रजीमध्ये "bone of contention' असे म्हणतात. वरील उदाहरणात हाड हे दोन कुत्र्यांमधील भांडणाला कारणीभूत ठरलं त्यामुळे  'हाड' हे 'bone of contention'.
कोलिन्स इंग्लिश डिक्शनरी मध्ये याचा अर्थ "The grounds or the subject of dispute" असा दिलेला आहे.

काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकीस्थान मधील ' bone of contention ' आहे. "theory of evolution" पेक्षा "theory of creation " वर विश्वास ठेवणारी Silvya Baker म्हणते कि, " The theory of evolution has been a 'bone of contention' for past 150 years."

सिविल सर्विसची परीक्षा तीन टप्यात होते; प्रिलिम, मेन आणि इंटरव्हू. प्रिलिम मध्ये २०० मार्कांची जनरल स्टडीज ची तर २००  मार्कांची CSAT ची परीक्षा होते. या CSAT च्या विरोधात विद्यार्थी होते कारण यात इंग्रजी या विषयाला प्राधान्य दिलेले होते. विद्यार्थी या विरोधात रस्त्यावर आले आणि त्यांनी आंदोलन सुरु केलं  त्यावेळी 'The Hindu' या वृत्तपत्राने ७ ऑगस्ट च्या अंकात म्हटले होते कि,
"The protesters' chief bone of contention is the aptitude test or CSAT, which gives more weightage to English, they say."

आर्टिकल ३७० बद्दल असेही म्हणतात, " The draft became bone of contention for all right wing thinkers all around India."

लोकपाल बिल लागू करावं म्हणून अण्णा हजारे यांनी आंदोलन सुरु केलं. परंतु सरकार यासाठी तयार नव्हती म्हणून आंदोलन तीव्र झालं त्यावेळी या आंदोलनाची समीक्षा करताना इंडिया टुडे  च्या २० ऑगस्ट च्या अंकात म्हटलं होतं, "lokpal bill : bone of contention between Government and Anna Hajare"

याच 'bone of contention' साठी दुसरा पर्यायी वाक्प्रचार आहे  'apple of discord' ज्याला आपण 'tender spot' असेही म्हणू. अशी नाजूक जागा कि जराही स्पर्श केला तरी परिस्थिती चिघळते.

आपल्या जवळ अधिक माहिती असल्यास नक्कीच कॉमेंट्स द्वारा शेअर करा अथवा मेल करा abhivyaktiindia2014@gmail.com
दत्तात्रय पटवर्धन